Posts

Friends

   Be the best friend of urself   The friends are very important part of our life. There are no specific words to difine them.everyone has different openion about friendship because mindset of every person is different.it is relationship where there are no boundaries of age, gender, caste & nationality. every person is different so everyone has different ability to make friends, different communication skills. They fullfill our life.they give different experiences. they give different perspective to life. Everyone has different experiences in the friendship. In this era we lost the personal touch . Because everyone is online available & easily  accessible .      There are so many writers & poet's who has written different things about friendship. I have different experiences at different stages.many friends meet at different stages & many leaved. they teached different lesson that no book has taught.they re      There are...

सोलापुरातील अष्टविनायक आठवा गणपती -श्री अतिथी गणपती

Image
🌺श्री अतिथी गणपती 🌺 सोलापुरातीचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या आग्नेय दिशेला असलेल्या मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयातील एका छोटेखानी मंदिरात हा शेळगीचा गणपती विराजमान झालेला आहे.  शिवयोगी सिद्धरामेश्वरांची कीर्ती ऐकून त्याकाळी शेजारच्या शेळगी ग्रामातील हा गणपती सिद्धरामांच्या पवित्र सानिध्यात राहावयास मिळावे ही इच्छा मनात धरून सोन्नलगीमध्ये आला व त्याने सिद्धरामास आश्रय देण्याची विनंती केली, अशी पुराणकथा या गणपतीबाबत प्रसिद्ध आहे.  श्री माधवराव पेशव्यांनी सोलापुरात माधव पेठ स्थापन केली. त्याकाळची ही घटना असावी, असे जुन्या जाणत्या लोकांकडून सांगण्यात येते. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 Location : Shree Shankeshwar Ling Temple Bhavani Peth, Solapur, Maharashtra https://goo.gl/maps/Gqz7qXZvTbvqccpy7

सोलापुरातील अष्टविनायक सातवा गणपती - श्री मश्रुम गणपती

Image
 🌺श्री मश्रुम गणपती 🌺 सोलापूरचे ग्रामदैवत  शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या उत्तरेस तुळजापूर रोडवरील हिप्परगा तलावाच्या शेजारी स्थापन केलेल्या या गणपतीचे मंदीर आहे.  या गणपतीचे नाव देखील कन्नडमिश्रित उच्चारानेयुक्त मश्रुम गणपती असे आहे. कन्नडमध्ये मश्रुम याचा भावार्थ 'मसरू' म्हणजे 'दही', 'उम्म' म्हणजे 'खा' किंवा 'जेव' असा होतो. या दोन्ही शब्दांचा जोडशब्द दही खाणारा गणपती असा होतो.  या शब्दाचा  अपभ्रंश  होऊन कालांतराने मश्रुम गणपती असे एकेरी नाव रूढ झाले. सोलापुरातून या गणपतीला पायी चालत जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  त्याचबरोबर हिप्परगा तलावाशेजारी हे मंदिर असल्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 स्थान / Location : https://goo.gl/maps/wgzqmuFjto3Q9BHD8 (Google Maps)

सोलापुरातील अष्टविनायक सहावा गणपती -श्री वीर कोलाहल गणपती

Image
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या वायव्य दिशेला सोलापूर - बार्शी रोडवरील मार्डीकडे जाणार्‍या रस्त्यावरील बाणेगाव येथील इरण्णा पाटील यांच्या वीटभट्टीजवळ शेतात रस्त्याच्या कडेला या गणपतीचे मंदीर आहे. हा गणपती आपल्या भक्कम दातांच्या सहायाने संकटरूपी असुरांचा नाश करून त्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करतो, अशी भक्तांची श्रध्दा आहे. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 स्थान / Location : https://goo.gl/maps/hyFAmnL9ZJMj6BgHA (Google Maps)

सोलापुरातील अष्टविनायक पाचवा गणपती:. श्री वीरकर गणपती

Image
सोलापुरातील ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या पश्‍चिम दिशेला सम्राट चौकाच्या अगोदर असलेल्या बसवंती मंगल कार्यालयाच्या अलीकडच्या बोळातून या वीरकर गणपतीचे मंदीर आहे.  संस्कृत भाषेत वीरकर म्हणजे शूरबाहू असलेला बलदंड हाताचा असा होतो.  श्री सिद्धरामेश्वर  यात्रेतील मानकरी देशमुख यांच्या मळ्यामध्ये असलेल्या या गणपतीच्या मंदीरातच सिध्दरामेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगापैकी ३१ वे पशुपतीय लिंगदेखील आहे. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 स्थान / Location : https://maps.app.goo.gl/PtXPHsaSjgqEPLbBA (Google Maps)

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.

Image
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या पूर्व दिशेला अक्कलकोट रोडवरील कुंभारी शिवारात नवीन अक्कलकोट जकात नाक्याला लागूनच रस्त्याच्या कडेला हे श्री वीरेश गणपतीचे मंदीर आहे.  पूर्वीच्या काळी सोलापूरहून श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या यात्रेस पायी चालत जाणारे भाविक यात्रेकरू आपला पुढील प्रवास सुखकर व्हावा यासाठी या गणपतीची प्रथम पूजा करून नंतर यात्रेस आरंभ करीत असत.  श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या जानेवारी महिन्यातील यात्रेच्या शुभारंभ हा वीरेश गणपतीला तेलाचा दिवा लावूनच दरवर्षी करण्यात येतो. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया या 🌺 Ganpati Ghat MH SH 151, Sangameshwar Nagar, Solapur, Maharashtra 413006 https://maps.app.goo.gl/Mr9tXobN2vrQEhro6

सोलापुरातील अष्टविनायक चौथा गणपती -: श्री करी गणपती

Image
सोलापुराचे  ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या सोलापूरच्या नैऋत्य दिशेला स्थापन केलेला चौथा गणपती म्हणजे सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील देगाव लमाण तांंड्यावरील करी गणपती होय.  कबीरसाहब मुल्ला या पैलवानाच्या शेतात या गणपतीचे मंदीर आहे. हा गणपती एका मुस्लीम धर्मीय कुटुंबाच्या मालकीच्या शेतात असून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन येथे घडते.  या गणपतीच्या दर्शनाने विशेष फळ म्हणजे दृष्टिबाधा म्हजेच नजर लागलेल्या लहान बालकांची सर्व पिडा दूर होते व दृष्टिदोषाचे निवारण होते अशी या गणपतीची ख्याती आहे. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 स्थान / Location : Kari Ganpati Solapur, Maharashtra 413002 https://maps.app.goo.gl/nquD3uN2EG7pzzix8

सोलापुरातील अष्टविनायक तिसरा गणपती- श्री नंदी तथा धुळी महांकाळ गणपती

Image
🌺 श्री धुळी महांकाळ गणपती 🌺  सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या दक्षिणेेला असलेल्या सोलापूर-विजयपूर महामार्गावरील कंबर तलाव म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्यासमोर असलेल्या पुरातन श्री रेवणसिध्देश्‍वर मंदीराच्या प्रांगणात स्वहस्ते स्थापन केलेला तिसरा गणपती हा धुळी महांकाळ गणपती होय.  या गणपतीचे नाव श्री नंदी म्हणजेच धुळी महांकाळ गणपती असे आहे. श्री रेवणसिध्देश्‍वर मंदीरात दर्शनासाठी येणार्‍या काही जाणकारांच्या मते आपल्या चिमुकल्या बाळास या गणपतीच्या चरणावर वाहतात. यामुळे बाळाचे आयुष्य वाढते, अशी श्रध्दा आहे. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 स्थान / Location  येथे क्लिक करा आणि दर्शन‌ घरच्या 🙏 goo.gl/maps/DAiJovh3JEw85mZe6  

सोलापुरातील अष्टविनायक दुसरा गणपती - श्री बेनक गणपती.

Image
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच  सोलापूरच्या अग्नेय दिशेला जुन्या कुंभारी ते होटगी रोडवरील होटगी शिवारात एका शेताच्या बांधावर बेनक गणपतीचे मंदिर आहे.  या गणपतीचे  दर्शन घेतल्यास तो भक्तांचा पाठीराखा बनून त्यांची सर्व दुःखे दूर करतो अशी श्रध्दा आहे. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 स्थान / Location : https://goo.gl/maps/T9fiyYRKvsAoYq6j8  

सोलापुरातील अष्टविनायक.

Image
 सोलापुराचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी  सोलन्नगी म्हणजेच सोलापूरच्या आठही दिशांना पुरातन काळात अष्टविनायकांची स्थापना केली आहे. सोलापूरच्या सुरक्षेसाठी , कोणत्याही प्रकारचे परकीय  आक्रमणे होऊ नयेत. सोलापुरातील जनता ही सुरक्षित राहावी यासाठी ही स्थापना केली आहे.  तर आपण पुढील सदरात. प्रत्येक अष्टविनायकांची माहिती घेऊया.                          🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺                          🌺 मंगलमुर्ती मोरया.     🌺 श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज.

What is your true power.

I have been thinking about this recently. And I thought I can share it with you... What is your TRUE power? What is YOUR true power as an individual human being? Is it money? Is it connections? Is it knowledge? Wisdom? Intelligence? All the above are potential energies. A lot of people have them. Not everyone has a lot, but everyone has something. You, with your life experience, will definitely have some money saved up, some knowledge and experience gained through the years and some intelligence. But what's the most powerful thing of this all? NONE of the above... None of these can be of any use if we do not use it. In my life experience, I have learned a thing or two. And I learned that, true power is always one thing: The power of Getting Started. Initiative. Starting something is the most powerful thing. Many people are more skilled than me. Many people are having more resources than many successful people. But the one thing that di...

सांगा शेती करू कशी. ?

जनता सारी  झोपली  का ? शेतकऱ्यावर कोपली का ? आत्महत्येची कारणे त्याच्या सांगा तुम्ही शोधली का ? शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची दोन रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी चार घोट पाणी पिऊन खेटर घेतलं उषाशी पोशिंदा तो जगाचा आज झोपला र  उपाशी सांगा शेती करू कशी?    करू कशी ? पोटाची खळगी भरू कशी कांद्याला भाव नाय ऊसाला भाव नाय तुरीला भाव नाय खाऊ काय? आलेल्या पैश्यात उधारी दिली मी सावकाराला देऊ काय? पोराच्या शाळेची फीज नाही भरली पोराला घरीच ठेवू काय एकच दिसतो पर्याय आता गळ्याला फास मी लावू काय? व्यापाराची मनमानी सरकारची आणीबाणी शान के साथ यांचा थाट कष्टकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाणी कसे देऊ शेताला वीज दिली रात्रीची रात्रीच्या त्या काळोखात भीती विंचू सापाची सांगा शेती करू कशी? करू कशी? पोटाची खळगी भरू कशी भरू कशी? मेहनत करून पिकविलेल्या मालाला आमच्या कमी भाव सरकारं जरी बदललं तरी कागदावरच हमी भाव भेगा पडल्या धरणी मायला दुष्काळी झाली परिस्थिती सर्वे,  दोरे खोटे सगळे प्रचारासाठी उपस्थिती जिवाच्या पल्याड ...

spirituality

Spirituality means observing life as it is. To see the reality without any emotions, memory. Observing the things as it is. & Acting according to that. We all made of same material. Although we have different biological basis. First thing we have to consider is iam not this body. Iam beyond this body. Because I don't have any control over my heartbeats, respiration , digestion & all other biological activities in this body . Then how should you say that iam this body. Scientifically we can say that iam not this  body.    To surrender ourself to the creator of this World is nothing but spirituality.

मी एक शेतकरीपुत्र

Image
शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असे म्हणतात.  खरंच आज शेतकर्‍याला  समाजात प्रतिष्ठेचे स्थान आहे का?  तो देखील समाजातील महत्त्वाचा घटक आहे. तो दिवस-रात्र शेतामध्ये कशाचिही परवा न‌ करता राबतो.  पण त्याच्याकष्टाला कवडीमोलाची देखील  किंमत नाही आपल्या समाजात.             तो अनेक  संघर्ष करून एखाद पिक पिकवतो. बी-बियाणे, खते, मशागत, मजुरांचा खर्च, ... ईत्यादी.  तो जेव्हा बाजारात आणतो त्याला योग्य भाव नाही मिळत. त्याचा एकूण खर्च देतील निघत नाही. मग काय करणार शेतकरी खचणार नाही तर काय होणार. त्याच्यामागे देखील सावकाराचे कर्ज असतो, मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च असतो, जीवनाच्या गोष्टी , मुलीचं लग्न असतं अशा अनेक गोष्टी असतात. मग तो आत्महत्या सारखा मार्ग निवडतो. त्याला आर्थिक पाठबळ देणारं कुणीच नसतं मला एक प्रश्न  पडतो आपण भाजीपाला खरेदी करतानाच काय बरं फारसा विचार करतो. आपण बाकिच्या   गोष्टी खरेदी करताना फारसा विचार करत नाही. तिथे गुपचूप पैसे देतो MRP नुसार. कारण त्याची किंमत ठरलेली असते. मला सांगा शेतकऱ्यांना का अधिक...

रट्टामारू डिग्रीचा उपयोग शून्य

Image

Instant gratification.

Instant gratification is becoming the enemy of youngsters. They're all are stuck into that. Due to that our  brain programed like that  it becomes Hungary for instant gratification. Due to that youngsters are wasting their to much valuable time. They lose patience while doing any work.it has biological basis that's why it is so strong. it releases hormones like dopamine & we become Happy.That's why it is addictive

Mountain

तुला बघता क्षणी, मी अलगपणे माझ्या विचारांपासून दूर होतो , जणू काही मी   निर्विचारहोउन जातो. तुझे ते रमणीय दृष्य जेवढे डोळ्यात समावता येईल तेवढे समवण्याच प्रयत्न मी करतो. त्या विलक्षण अश्या चित्रकडे बघत मी एकच विचार करत आहे की , तुला बनवणारा तो चित्रकार किती महान असेल . तुझ्या पायथ्याशी थांबून मी स्वतः जरी क्षुद्र प्राण्या सारखा दिसत असेल, तरी तुला बघन्याचे सौभाग्य जे लाभले. ना जाणे कित्येक युग लागले असतील तुला बनण्यासाठी , ना जाणे कित्येक सोसावे लागले असतील तुला आणि आता तुला भूमाता ने अतिशय सुंदर सजविले आहे. तुझ्यात काही तरी आहे सांगण्यासारखे आहे ,जे प्रत्येकाला आयुष्यात दिशा देऊ शकेल ,कदाचित? अश्या त्या ना विसरता येणाऱ्या दृशाला मी सांगू इच्छितो की, Mountain , I love you!!                                             -  adrsh patil

निसर्गाचं संकेत वेळीच ओळखा.

आज कळालं निसर्गापुढे माणूस काहीच करू शकत नाही. आज माणूस प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे, प्रगती  करत आहे पण त्याचं निसर्गाकडे लक्ष नाही. प्रगतीच्या नावाखाली माणूस निसर्गाची भरमसाठ हानी करतोय.  निसर्गाला त्याच्या परिणे त्याला राहू द्या ना त्यात हस्तक्षेप कशाला करता. आज प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, वृक्षतोड वाढत आहे. याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे तर  लागणारच आहेत वृक्षलागवडीचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे पण वृक्ष लागवड कोण करत नाही, केलं तरी पण ते दाखवण्यापुरतेच. उद्या भविष्यकाळात ऍसिड रेन, तोंडाला ऑक्सिजनचे मास्क लावून फिरण्याची वेळ आली तर नवल समजू नका, पाण्यासाठी युद्ध अशा गोष्टी होणार आहेत. वातावरणात शुद्ध ऑक्सिजन फार कमी झालेला आहे, प्रचंड प्रमाणात वायुपदूषण झालेला आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची गरज आहे. उगी ऊठसूट खाजगी वाहनाने फिरणे हे योग्य नाही. मला इथे एकच सांगायचे आहे निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे वृक्षलागवड, जलसंवर्धन , वायुप्रदूषण कसे कमी होईल याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.

युवक असावा असा !

चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करूणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियांवर संयम आहे मन ज्याचे स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धाडसाचे बळ आहे सिंहासारखा निर्भय आहे ध्येय ज्याचे उच्च आहे सत्य ज्याचा ईश्वर आहे व्यसनांपासून मुक्त आहे जीवनामध्ये शिस्त आहे प्रेमळ त्याचा सूर आहे मानवता हेच कूळ आहे गुरुजनांचा आदर आहे पालकांवरती श्रद्धा आहे दीनदुबळ्यांचा मित्र आहे सेवेसाठी तत्पर आहे देवावरती भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे चरित्र ज्याचे शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे                   -  स्वामी विवेकानंद

डॉ. राजेंद्र भारूड ( जिल्हाधिकारी, नंदुरबार)

Image
भिल्ल समाजातील प्रथम कलेक्टर अशी ज्यांची ओळख करून दिली जाते, ते डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या संघर्षाची ही उमेदीची गोष्ट. हातातल्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट लिहीत राहिलो असतो, आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाची दुःख उगाळत राहिलो असतो तर इथवर पोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकच कळत होतं,आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.