युवक असावा असा !
- चेहऱ्यावर तेज आहे
- देहामध्ये शक्ती आहे
- मनामध्ये उत्साह आहे
- बुद्धीमध्ये विवेक आहे
- हृदयामध्ये करूणा आहे
- मातृभूमीवर प्रेम आहे
- इंद्रियांवर संयम आहे
- मन ज्याचे स्थिर आहे
- आत्मविश्वास दृढ आहे
- इच्छाशक्ती प्रबळ आहे
- धाडसाचे बळ आहे
- सिंहासारखा निर्भय आहे
- ध्येय ज्याचे उच्च आहे
- सत्य ज्याचा ईश्वर आहे
- व्यसनांपासून मुक्त आहे
- जीवनामध्ये शिस्त आहे
- प्रेमळ त्याचा सूर आहे
- मानवता हेच कूळ आहे
- गुरुजनांचा आदर आहे
- पालकांवरती श्रद्धा आहे
- दीनदुबळ्यांचा मित्र आहे
- सेवेसाठी तत्पर आहे
- देवावरती भक्ती आहे
- जीवनामध्ये नीती आहे
- चरित्र ज्याचे शुद्ध आहे
- तोच आदर्श युवक आहे
- स्वामी विवेकानंद
Comments
Post a Comment