सोलापुरातील अष्टविनायक सातवा गणपती - श्री मश्रुम गणपती
![]() |
| 🌺श्री मश्रुम गणपती 🌺 |
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या उत्तरेस तुळजापूर रोडवरील हिप्परगा तलावाच्या शेजारी स्थापन केलेल्या या गणपतीचे मंदीर आहे.
या गणपतीचे नाव देखील कन्नडमिश्रित उच्चारानेयुक्त मश्रुम गणपती असे आहे. कन्नडमध्ये मश्रुम याचा भावार्थ 'मसरू' म्हणजे 'दही', 'उम्म' म्हणजे 'खा' किंवा 'जेव' असा होतो. या दोन्ही शब्दांचा जोडशब्द दही खाणारा गणपती असा होतो.
या शब्दाचा अपभ्रंश होऊन कालांतराने मश्रुम गणपती असे एकेरी नाव रूढ झाले. सोलापुरातून या गणपतीला पायी चालत जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
त्याचबरोबर हिप्परगा तलावाशेजारी हे मंदिर असल्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.
🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺
स्थान / Location : https://goo.gl/maps/wgzqmuFjto3Q9BHD8 (Google Maps)

Best I didn't know that
ReplyDelete🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺
Delete