निसर्गाचं संकेत वेळीच ओळखा.


आज कळालं निसर्गापुढे माणूस काहीच करू शकत नाही. आज माणूस प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे, प्रगती  करत आहे पण त्याचं निसर्गाकडे लक्ष नाही. प्रगतीच्या नावाखाली माणूस निसर्गाची भरमसाठ हानी करतोय.
 निसर्गाला त्याच्या परिणे त्याला राहू द्या ना त्यात हस्तक्षेप कशाला करता. आज प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, वृक्षतोड वाढत आहे. याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे तर  लागणारच आहेत
वृक्षलागवडीचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे पण वृक्ष लागवड कोण करत नाही, केलं तरी पण ते दाखवण्यापुरतेच.
उद्या भविष्यकाळात ऍसिड रेन, तोंडाला ऑक्सिजनचे मास्क लावून फिरण्याची वेळ आली तर नवल समजू नका, पाण्यासाठी युद्ध अशा गोष्टी होणार आहेत.
वातावरणात शुद्ध ऑक्सिजन फार कमी झालेला आहे, प्रचंड प्रमाणात वायुपदूषण झालेला आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची गरज आहे. उगी ऊठसूट खाजगी वाहनाने फिरणे हे योग्य नाही.

मला इथे एकच सांगायचे आहे निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे वृक्षलागवड, जलसंवर्धन , वायुप्रदूषण कसे कमी होईल याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.