सोलापुरातील अष्टविनायक आठवा गणपती -श्री अतिथी गणपती
🌺श्री अतिथी गणपती 🌺 सोलापुरातीचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या आग्नेय दिशेला असलेल्या मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयातील एका छोटेखानी मंदिरात हा शेळगीचा गणपती विराजमान झालेला आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची कीर्ती ऐकून त्याकाळी शेजारच्या शेळगी ग्रामातील हा गणपती सिद्धरामांच्या पवित्र सानिध्यात राहावयास मिळावे ही इच्छा मनात धरून सोन्नलगीमध्ये आला व त्याने सिद्धरामास आश्रय देण्याची विनंती केली, अशी पुराणकथा या गणपतीबाबत प्रसिद्ध आहे. श्री माधवराव पेशव्यांनी सोलापुरात माधव पेठ स्थापन केली. त्याकाळची ही घटना असावी, असे जुन्या जाणत्या लोकांकडून सांगण्यात येते. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 Location : Shree Shankeshwar Ling Temple Bhavani Peth, Solapur, Maharashtra https://goo.gl/maps/Gqz7qXZvTbvqccpy7