जागतिक महिला दिन विशेष.

आज जागतिक महिला दिन.
काही प्रश्न विचारावेसे वाटतात

का नाही आपण स्त्रियांना दररोज सन्मान देत नाही. ?
का तिला कमजोर समजलं जातं.?
का स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात ह्याच देशात?

आज दररोज महिलांवर अन्याय अत्याचार होतात. का  आपण ही पुरुषसत्ताक मानसिकता बदलू शकत नाही अरे ती कोणाची तरी   बहीण, पत्नी , आई, आहे ना . आपण ज्या नजरेने घरात आई बहिणीकडे बघतो त्याच नजरेने बघ ना. अरे  जिच्यामुळे हे सुंदर असं विश्व बघता आलं तिचे आभार मानना . हे असं अजून किती दिवस चालणार आहे या देशात.

मला एक पुरुष म्हणून जगताना लाज वाटते हे की हे  असं का चाललंय. कुठे कमी पडतोय आम्ही. आमच्याकडे कायदे पण फार कडक नाहीत ना .अरे कायदा तरी काय करणार जर तुमची मानसिकता बदलू शकलो नाही तर आपण.

नुसते कागदोपत्री 50 टक्के आरक्षण दिलं असलं तरीही तिला पावलोपावली संघर्ष करावा लागतो.का तिला सगळीकडे समान संधी मिळत नाही. तिच्यावर अनेक बंधने लादली जातात. तिला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावं लागतं.

हेच का ते महाराष्ट्र जिथे सावित्रीबाई फुले , जिजाऊ माता, आनंदीबाई जोशी अशा अनेक वीर स्त्रिया जन्मल्या.

आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आहेत असं एकही क्षेत्र उरलं नाही की जिथं महिला काम करू शकत नाहीत परवाचच बघाना लेफ्टनंट जनरल या पदी सुद्धा महिलेची नेमणूक झाली. पण यासाठी सुद्धा तिला किती संघर्ष करावा लागला‌. कि मने  काही अधिकारी तिचे निर्णय ऐकणार नाहीत. का पुरुषांच नाव  कोरून ठेवलेले आहे त्या पदासाठी. का नाही? तिच्यात ती पात्रता नाही का?
 तरीही तिला संधी दिली जात नाही .

मला असं वाटतंय एक दिवस  महिला दिन साजरा करून.या दिवशी तीला गोड, गोड, चांगले, चांगले संदेश पाठवून. बड्या बड्या बाता  करून एका दिवसापुरता सन्मान न देता. तिला तिच्या रोजच्या जगण्यात , समाजात वावरत असताना ,तिच्या निर्णयांना जर आपण महत्त्व दिलं, सन्मान दिलं तर मला नाही वाटत असल्या बाकीच्या गोष्टीची गरज आहे कायदे, सुरक्षितता वगैरे वगैर.

 तिला जर  सुरक्षितता आणि योग्य तो सन्मान दिला तर रोजच महिलादिन साजरा होईल....
अजून बोलण्यासारखं खूप काही आहे पण मी इथेच थांबतो.

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.