मी मराठी

येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन.
जरा विचार करा आपण मराठी किती बोलतो . का आपण आपल्या भाषेला कमी  समजतो. मराठी बोलणार्‍याला कमी समजल जातं इंग्रजी बोलणार्‍याला खूप भारी समजलं जातं. मग आपणच म्हणतो आपली भाषा कमी होत चाललेली आहे. आपण किती मराठी साहित्य वाचतो,  किंवा मराठी साहित्य विषयी माहिती आहे. साधारण दहावी- बारावी नंतर मराठी भाषेचा संबंध विद्यार्थ्यी जीवनाशी संपतो.

कुणी अभियांत्रिकीला जातो , कोणी कला शाखेला जातो , कोणी वाणिज्य शाखेला , तर कोणी विज्ञान शाखेला. त्यानंतर विद्यार्थी जीवनाचा आणि मराठीचा संबंध संपतो त्यानंतर कोण  मराठी साहित्य वाचत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा वापर हळूहळू कमी होत चाललेल आहे,  मराठीच्या जागी इंग्रजी शब्द येऊ लागलेले आहेत.

आता काही पालक देखील आपल्या मुलाला मराठी माध्यमातून न घालता, इंग्लिश माध्यमात शिकवत आहेत. जर आपण विज्ञान, गणित  हे विषय जर इंग्रजी माध्यमातून शिकत असलो तर ठिक आहे ना. परंतु मराठी भाषा शिकवली जात नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये , सरकारने आता जो निर्णय घेतला आहे तो चांगलाच आहे मराठी भाषा सर्व शाळेत सक्तीच   करण्याचा विचार आहे .

 आपण जर का  महानगरांमध्ये बघायला गेलं तर पुणे, मुंबई येथे मराठी बोलल जात नाही, सगळीकडे हिंदी आणि इंग्रजीच बोललं जातं मग मराठी भाषा कशी विकसित होणार.

मराठी व्याकरणाची तर पार वाट लावली आहे  आपण सगळ्यांनी, मराठी आपण इंग्रजीतून टाईप करतो.

या ठिकाणी असं मनावसं वाटत.


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमच्या मनामनात रंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी



आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी.



आमुच्या कुला कुलात नांदते मराठी 
येथल्या फुलाफुलात हासते मराठी 
येथल्या दिशादिशात दाटते मराठी 
येथल्या नगानगात गर्जते मराठी 

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी







आपण आपली मातृभाषा विकसित केली पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. एवढाच संदेश या ठिकाणी
द्यावं वाटतं .







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.