सोलापुरातील अष्टविनायक तिसरा गणपती- श्री नंदी तथा धुळी महांकाळ गणपती
🌺 श्री धुळी महांकाळ गणपती 🌺 सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या दक्षिणेेला असलेल्या सोलापूर-विजयपूर महामार्गावरील कंबर तलाव म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्यासमोर असलेल्या पुरातन श्री रेवणसिध्देश्वर मंदीराच्या प्रांगणात स्वहस्ते स्थापन केलेला तिसरा गणपती हा धुळी महांकाळ गणपती होय. या गणपतीचे नाव श्री नंदी म्हणजेच धुळी महांकाळ गणपती असे आहे. श्री रेवणसिध्देश्वर मंदीरात दर्शनासाठी येणार्या काही जाणकारांच्या मते आपल्या चिमुकल्या बाळास या गणपतीच्या चरणावर वाहतात. यामुळे बाळाचे आयुष्य वाढते, अशी श्रध्दा आहे. 🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺 स्थान / Location येथे क्लिक करा आणि दर्शन घरच्या 🙏 goo.gl/maps/DAiJovh3JEw85mZe6