मोकळा संवाद

मित्रांनो आयुष्यात जे काय करायचंय ना ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करा नाकी दुसऱ्याच्या आनंदासाठी .
लोक काय म्हणतील याचा फारसा विचार करू नका.

हेच ते वय आहे (१८-२५) तुम्ही काहीही करून पाहू शकता .
यश आणि अपयश याची तमा न बाळगता.
प्रत्येक दिवशी काहीना काहीतरी शिकत राहा दिवस वाया घालवू नका. प्रत्येक दिवशी एक नवीन आव्हान स्वीकारा . ठराविक अश्या
साचेबद्ध पद्धतीने विचार करणे सोडून द्या स्वतःला एक्सप्लोर करा .

स्वतःशी संवाद साधा आयुष्यातील अनेक प्रश्न हे स्वतःशी संवाद साधल्याने सुटतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेच आहेत फक्त ती शोधण्याची इच्छा पाहिजे.
न्यूनगंड सोडा फार फार तर काय होईल अपयश येईल, लोक चेष्टा करतील त्याने काय फरक पडतोय.
आयुष्य जगताना अनेक प्रश्न पडतात फक्त त्याचे आपापल्या पद्धतीने शोधायचे असतात.

सोशल मीडियावर फारसा वेळ वाया घालू नका. 

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.