आपलं सोलापूर बे!

सोलापुर.  सोला- ( सोळा -१६)‌ पूर( गावं). पूर्वी शहर  16 गावाने मिळून बनलेलं होतं.
सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील एक शहर. इथं कर्नाटक , आंध्रप्रदेश इत्यादी विविध राज्यातून आलेले लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविध बोलीभाषीकांचा  शहर म्हणून ओळखला जाणारा .इथं  कन्नड, तमिळ ,हिंदी, मराठी ,उर्दू अशा अनेक भाषा बोलल्या जातात.

सोलापूरचा ऐतिहासिक वारसा जर बघितलं तर भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा सोलापूर हे असं   देशातलं पहिलं  शहर असेल  जे ९-११ मे १९३०  या काळात तीन दिवस स्वतंत्र होतं. यासाठी अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा जगन्नाथ शिंदे,  यांना हौतात्म्य पत्करावे लागले.

सोलापूर  हे  ज्वारीचे कोठार , चादर , शेंगांची चटणी, पिठलं -भाकरी यासह अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे.

सोलापुरात अनेक धार्मिक स्थळ देखील आहेत पंढरपूर
विठ्ठल,  अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, तुळजापूर आई-भवानी आणि सोलापूर श्री सिद्धरामेश्वर. अशा प्रकारची धार्मिक स्थळे आहेत.यामुळे  बाहेरचे येणारे लोक देखील  जास्त आहेत.

पर्यटन स्थळ भुईकोट किल्ला , नळदुर्ग , नान्नज पक्षी अभयारण्य, कंबर तलावा जवळील स्मृतीवन आणखी बघण्यासारखं खूप काही आहे.

सोलापूर ला दोन लोकसभा मतदारसंघ व  11 विधानसभा मतदारसंघ लाभलेले आहेत.या ठिकाणी अनेक साखर कारखाने आहेत साधारण पणे २७-२८ साखर कारखाने आहेत. उसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. सोलापूरला भीमानदी लाभलेली आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने सोलापूर हे महाराष्ट्रातील महत्वाचे शहर आहे. इथून सोलापूर- हैदराबाद, सोलापूर -विजापूर, हे राष्ट्रीय महामार्ग जातात. रेल्वेने अनेक शहरांना व राज्यांना जोडलेले आहे.


आता सध्या सोलापूरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. नवनवीन प्रकल्प होत आहेत.
आणखी बरंच काही.......



Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.