सांगा शेती करू कशी. ?
जनता सारी झोपली का ? शेतकऱ्यावर कोपली का ? आत्महत्येची कारणे त्याच्या सांगा तुम्ही शोधली का ? शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची दोन रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी चार घोट पाणी पिऊन खेटर घेतलं उषाशी पोशिंदा तो जगाचा आज झोपला र उपाशी सांगा शेती करू कशी? करू कशी ? पोटाची खळगी भरू कशी कांद्याला भाव नाय ऊसाला भाव नाय तुरीला भाव नाय खाऊ काय? आलेल्या पैश्यात उधारी दिली मी सावकाराला देऊ काय? पोराच्या शाळेची फीज नाही भरली पोराला घरीच ठेवू काय एकच दिसतो पर्याय आता गळ्याला फास मी लावू काय? व्यापाराची मनमानी सरकारची आणीबाणी शान के साथ यांचा थाट कष्टकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाणी कसे देऊ शेताला वीज दिली रात्रीची रात्रीच्या त्या काळोखात भीती विंचू सापाची सांगा शेती करू कशी? करू कशी? पोटाची खळगी भरू कशी भरू कशी? मेहनत करून पिकविलेल्या मालाला आमच्या कमी भाव सरकारं जरी बदललं तरी कागदावरच हमी भाव भेगा पडल्या धरणी मायला दुष्काळी झाली परिस्थिती सर्वे, दोरे खोटे सगळे प्रचारासाठी उपस्थिती जिवाच्या पल्याड ...